लॉकडाऊनमध्ये पुण्यातील मार्केटयार्ड परीसरात सिगारेटची विक्री; तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही मार्केटयार्ड परिसरात सिगारेटची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर खंडणी व अंमली विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 39 लाख किंमतीचा सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. शशिकांत रामस्वरूप चमाडिया ( वय 43, रा. कोरेगाव पार्क )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरू असतानाही मार्केटयार्ड परिसरात असलेल्या चमाडिया ट्रेडिंग दुकानात सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून त्याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवले. त्यावेळेस चमाडीया सिगारेटची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून 39 लाखांचे 37 सिगारेट बॉक्स जप्त केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, संजय गायकवाड, एकनाथ कंधारे, पांडुरंग वांजळे, हनुमंत गायकवाड, विजय गुरव, सुनील चिखले यांच्या पथकाने केली.