कॉफी पिताना सिगारेट ओढण्याची सवय आहे का? वेळीच व्हा सावध

दिवसभराचा कामाचा ताण निघून जाण्यासाठी गरमागरम कॉफी किंवा चहा…प्यायला कोणाला आवडणार नाही! काही जणांच्या दिवसाची सुरुवात या दोनपैकी एका पेयानेच होते. त्यासोबत एखादा आवडीचा पदार्थ नमकिन्स, चाट, वेफर्स, बिस्किट्स असे काही असेल तर अजूनच मजा येते, मग ती ब्लॅक कॉफी असो, किंवा मिल्क कॉफी असो नाहीतर कॉफीचा इतर कोणताही प्रकार असो. कार्यालय, घर कॉफी, चहाचे सेवन हा आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे. मात्र बहुतेक जणांना कॉफीसोबत सिगारेट ओढण्याची सवय असते. ही सवय जर कोणाला असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

डिहायड्रेशनचा अभाव
जे कॉफी आणि सिगारेट एकत्र सेवन करतात त्यांना अनेकदा डिहायड्रेशनची तक्रार असते. शरीरात हायड्रेशनच्या कमतरतेमुळे ओठ आणि मान काळे पडण्याची शक्यता असते. एवढेच नाही, तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे येण्याची तक्रारही होऊ शकते.

निद्रानाश
जे लोक कॉफी आणि सिगारेट एकत्र सेवन करतात त्यांना अनेकदा झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कॅफिनमुळे झोपेच्या व्यवस्थापनात बिघाड होऊ शकतो. ही समस्या बरेच दिवस सुरू राहू शकते.

पोटाचा त्रास
कॉफी आणि सिगारेट सेवन करणाऱ्यांनाही पोटाशी संबंधित विकारांना सामोरे जावे लागते, अशा वेळी कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास पोट खराब होऊ शकते.

उच्च रक्तदाब
कॉफीच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते, असेही मानले जाते. उच्च रक्तदाबामुळे पेशी प्रभावित होतात आणि अशावेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.