‘तेजस’च्या उड्डाणाला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वायुसेनेचे लढाऊ विमान ‘तेजस’चे लँडिंगदरम्यान ब्रेक खराब झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर ताफ्यातील सर्व तेजस विमानांची उड्डाणे रोखण्यात आली असून विमानांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. मात्र ‘तेजस’ची निर्माती कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने विमान अपघाताचे वृत्त फेटाळाले असून विमान जमिनीवर असताना किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणार्थी उड्डाणानंतर लँडिंगदरम्यान ‘तेजस’चे ब्रेक खराब झाले आणि त्यामुळे विमान धावपट्टीच्या पुढे गेले. या घटनेत वैमानिक प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे बाहेर पडला, मात्र विमानाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या खड्डय़ात कोसळले.