
प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद राशीद खान यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार राशीद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. 22 नोव्हेंबर पासून कोलकत्तामधील पीयरलेस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 10 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राशीद खान यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रूग्णालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी राशीद खान यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले. मंगळवारी दुपारी 3.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Music maestro Ustad Rashid Khan passes away
Read @ANI Story | https://t.co/VhgxcFexJs#UstadRashidKhan #RashidKhan #Music #Death pic.twitter.com/qkSkScunrY
— ANI Digital (@ani_digital) January 9, 2024
राशीद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये झाला. त्यांचे संगीत शिक्षण रामपूर- सहस्वान घराण्यातून झाले होते. वयाच्या 11 व्या वर्षापासून त्यांनी कार्यक्रमांमध्ये गाण्यास सुरूवात केली होती.
राशीद खान यांचा 2022 मध्ये पद्मभूषणने सन्मान करण्यात आला होता. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या जब वी मेट या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘आओगे जब तुम वो साजना’ हे गाणे गायले होते. या बरोबरच ‘माय नेम इज खान’, ‘राझ 3’, ‘मंटो’, आणि ‘शादी में जरूर आना’ यांसारख्या चित्रपटांमधील गाणी त्यांनी गायली आहेत.
राशीद खान यांचा दफनविधी शासकीय इतमामात करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव रवींद्र सदन येथे ठेवण्यात येणार असून तेथे चाहत्यांना अंत्यदर्शन करता येणार आहे.


























































