
दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून जून 2026 पर्यंत या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाच्या माध्यमातून जनसेवेच्या आणि विकासाच्या नव्या योजना सुरू करण्यात येतील, अशीही घोषणा त्यांनी केली.





























































