लॉकडाऊन वाढवला, पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ट्विटमुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

देशातील लॉकडाऊन वाढवा अशी विनंती राज्य सरकारांनी केंद्र सरकारला केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली होती. पण लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर पंतप्रधान मोदी अजून काहीच बोलले नाही. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या हवाल्याने देशात लॉकडाऊन वाढवला आहे असे सांगितले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 7 हजार 444 रुग्ण आढळले आहेत. त्यात देशातील लॉकडाऊन वाढवावा अशी विनंती राज्य सरकार करत आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी कुठलाच निर्णय जाहीर केला नाही. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत देशात लॉकडाऊन वाढवल्याची माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपण लॉकडाऊन वेळीच जाहीर केल्यान आज हिंदुस्थानची विकसित देशांपेक्षा अवस्था खूप चांगली आहे. जर आता आपण हा लॉकडाऊन मागे घेतली तर आपले सर्व प्रयत्न वाया जातील. म्हणून हा लॉकडाऊन वाढवणे गरजेचे आहे.

14 एप्रिल हा लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यापूवी लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. परंतु पंतप्रधान मोदींपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.