
कोकणासह कोल्हापूरमध्येही पूरस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले आहे. जिल्ह्यातील पूर आलेल्या ठिकाणांची पाहणी करून तेथील नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धीर देणार आहेत.
कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले असून ते शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथील बाधित भागांची पाहणी करणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी 1 वाजता ते शाहूपुरी 6 वी गल्ली येथे तसेच कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी व तिथून पुढे पंचगंगा हॉस्पिटल गंगावेश ते शिवाजी पूल येथील झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी 2.00 वाजता स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार असून त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
विमानतळावर पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील ,मुख्य सचिव सिताराम कुंटे, खासदार धैर्यशील माने ,संजय मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते .

































































