
दक्षिण मुंबईतील वाहतूककाsंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी येथे करण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी केली जाणार असून ही चाचणी करताना आरेतील एकाही झाडाला धक्का लागू देऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई येथील वाहतूककाोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाइन-3 चे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या पंपनीने श्रीसिटी आंध्र प्रदेश येथे आठ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. आता पुढील चाचण्या मुंबईत होणार आहेत.
या मार्गावर धावण्यासाठी 31 मेट्रो ट्रेन मिळणार
मुंबईत या आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनची चाचणी प्रत्यक्षात 10 हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवरदेखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या 31 ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.
कुठे होणार चाचणी?
सध्या मरोळ-मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून या ठिकाणी चाचणीसाठी मार्ग तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही.




























































