सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार

कम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या किमती 1 जानेवारीपासून स्वस्त होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक बोर्डाने टॅरिफमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना राज्य आणि लागू टॅक्सनुसार प्रति युनिट दोन ते तीन रुपयांपर्यंत बचत मिळू शकते. पीएनजीआरबीने झोनची संख्या तीनऐवजी दोन केली आहे. यात 200 किलोमीटरपर्यंत 42 रुपये तर 300 ते 1200 किलोमीटरपर्यंत 80 रुपये आणि 1200 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी 107 टॅरिफ होता. आता तीन ऐवजी दोन झोन असतील पहिल्या झोनसाठी यूनिफाइड दर 54 रुपये ठरवली. आधी 80 आणि 107 रुपये होती.