कोस्टल रोडच्या ‘मावळा’चे काम फत्ते, दोन किमीचे दोन महाकाय बोगदे खोदले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडच्या कामातील 2.072 किमीचे दोन महाकाय बोगदे खोदणाऱया ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनचे काम पूर्ण झाल्यामुळे या मशीनचे पाच भाग आता सुटे करण्यात येणार आहेत. सुमारे 500 कोटींचा खर्च करून तब्बल चार मजली इमारती इतकी उंची असलेल्या ‘मावळा’ टनेल मशीन जोडण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. आता ही मशीन मोकळय़ा जागेत आणली असून पाच प्रमुख टप्प्यातील भाग सुटे करायला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

मुंबईची वाहतूककाsंडी फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पाचे एकूण 77 टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे बांधण्यात आले आहेत. दोन भूमिगत बोगदे खोदण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीने चीनहून 500 कोटी रुपये खर्चून चार मजली इमारतीएवढी उंची असलेला टनेल बोअरिंग मशीन (मावळा) आणला. दरम्यान, नोव्हेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधनाची, तर 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये 70 हेक्टर एवढे हरित क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे.

असे झाले मावळाचे काम

– मे 2020 मध्ये ‘मावळा’ चीनमधून मुंबईत आणला गेला. यानंतर जून 2020 पासून पाच महिन्यांत पाच विभागांत असलेला मावळा जोडण्यात आला.
– प्रकल्पातील aपहिला बोगदा खोदण्याचा टप्पा 10 जानेवारी 2022 रोजी पूर्ण झाला आहे. तर दुसऱया बोगद्याचे काम 9 एप्रिल 2022 मध्ये सुरु झाले आणि दुसऱया बोगद्याचे काम ‘मावळा’ ने 30 मे 2023 रोजी फत्ते केले.
– कोस्टल रोड प्रकल्पात भूमिगत बोगदे खोदणे हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला. बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल 2300 टन आहे, तर व्यास 12.19 मीटर आहे.