
ऑस्टेलियात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीतील डॉमिनोजच्या पिझ्झामध्ये झुरळ मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर हे पिझ्झा शॉप बंद करण्यात आले असून 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील डॉमिनोजच्या एका शॉपमध्ये एका ग्राहकाला पिझ्झासोबत झुरळ शिजवून वाढलं. त्यानंतर संतापलेल्या ग्राहकाने याबाबत तक्रार केली. त्यानंतर स्वास्थ्य निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्टोरची पाहणी केली असता स्वयपाकघरात प्रचंड अस्वच्छता आढळली. जिथे पिझ्झासोबत वेगवेगळ्या डिश तयार होत असतात. तिथेही अस्वच्छता होती. लादीवर अस्वच्छता पसरली होती. डफ मशिनमध्ये अस्वच्छता, कंटेनर अस्वच्छ मिळाले. एवढी अस्वच्छता पाहून डॉमिनोज पिझ्झाच्या स्टोअरला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विलोबी काऊंसिलने सांगितले की, डॉमिनोज पिझ्झाच्या या स्टोअरला यापूर्वी अनेक इशारे देण्यात आले होते, कारण येथे ठरवून दिलेले नियम पाळले गेले नाहीत. त्याचवेळी या प्रकरणी डॉमिनोजकडून सांगण्यात आले आहे की पिझ्झा कंपनीने पीडित ग्राहकाची माफी मागितली. डॉमिनोजने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, त्यांनी हे स्टोर मागच्या आठवड्यात बंद करुन त्याची स्वच्छता, डागडुजी सुरु केली आहे. उपकरणांची सफाई केली जात आहे. सगळ्या जागेवर सॅनिटाईज केले आहे.
तिथेच काऊंसिलने स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्या सगळ्यांनाच सूचना दिली आहे, काऊन्सिलने सांगितले फूड सेफ्टी महत्वाची आहे. यावेळी साफसफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वच्छतेची काळजी न घेणाऱ्या आजूबाजूला असलेल्या अशा व्यवसायांशी संबंधित लोकांनाही काऊंसिलने ताकीद दिली आहे. काऊंसिलने सांगितले की ते अन्न सुरक्षा अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचे असून स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.


























































