नारळाच्या पानांपासून बनवलेले स्ट्रॉ होत आहेत लोकप्रिय

632

बंगळुरूतील ख्रिस्त विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक साजी वर्गिस यांनी प्लॅस्टिकच्या स्ट्राँना पर्याय म्हणून नारळाच्या झाडाच्या पानांपासून सुरक्षित आणि इकोफ्रेंडली स्ट्रॉचे उत्पादन सुरू केले आहे. वर्गीस यांच्या या स्ट्रॉला देशातूनच नक्हे, तर परदेशातूनही मोठी मागणी येत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वर्गीस यांचे इकोफ्रेंडली स्ट्रॉ जगभरात लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यांच्या या स्ट्रॉला सध्या अमेरिका, मलेशिया, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स यांसारख्या देशांमधून मागणी आहे. काही दिवसांपूर्की JW Marriot हॉटेलने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला ऑर्डर दिली असे साजी यांनी सांगितलं. या स्ट्रॉ सहा महिने टिकू शकतात. त्या सनबर्ड स्ट्रॉ म्हणून बाजारात विक्रीला आणण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या