
सामना ऑनलाईन । नगर
राज्यात गेल्या तीन दिवसापासून थंडीचा कडाका वाढत गेला आहे. धुळ्यात 6.8 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रील अनेक भागात आज तापमानाचा पारा खाली आल्याचे पाहायला मिळाले. तर पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढला असून नगरकर चांगलेच गारठले आहेत. आज साधारणता 8.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे.



























































