
उत्तर हिंदुस्थानातून येणाऱया थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान 5.1 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड 7.5 डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले. रविवारी नागपूर येथे 5.3 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले. येत्या 48 तासांत विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे नागपुरातील देवळांमध्ये देवदेवतांना उबदार शाली पांघरण्यात आल्या आहेत. विदर्भात पारा 4 ते 5 अंश सेल्सिएसने खाली घसरल्याने संपूर्ण विदर्भालाच हुडहुडी भरली आहे.
उत्तर हिंदुस्थानात होत असलेली बर्फवृष्टी व हवेची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे असल्याने मध्य हिंदुस्थानात कडाक्याची थंडी आहे. विदर्भात गडचिरोली व वाशिम 9.0 व यवतमाळ 9.4 अंश सेल्सियस तसेच बुलडाणा 10.4 वगळले तर सर्व जिह्यांतील तापमान सरासरी 8 अंश सेल्सियसपर्यंत राहिले. नागपूरनंतर चंद्रपूर थंडीच्या बाबतीत दुसऱया क्रमांकावर राहिले. येथे किमान तापमान 5.1 अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.



























































