नगरमध्ये थंडीचा नीचांक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

उत्तरेकडून वाहणारे अति थंड वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे नगरमध्ये हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान 4.4 अंश सेल्सिअसची नोंद आज झाली आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान आहे. 11 वर्षांतील नगरमधील हे निच्चांकी तापमान आहे. दि. 19 डिसेंबर 2018 ला 4.5 अंश सेल्सिअस तापमानानंतर आज सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. प्रथमच फेब्रुवारी महिन्यांत तापमानात एवढ मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नगरमध्ये थंडी जाणवू लागली पण आज या थंडीने आपली सीमा ओलांडलेली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिना म्हणजे उन्हाळा सुरु होत असल्याची जाणीव करुन देणारा हा महिना पण, उत्तरेत होत असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीचा परिणाम व राज्यातील कोरडे हवामान यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट अनुभवायला येत आहे. या थंडीच्या लाटेने नगरकर गारठले आहे. आज सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर कडक थंडीने हुडहुडी भरली आहे. नगरकरांच्या अंगावर स्वेटर, जर्किन दिसून येत होते. ढगाळ हवामानामुळे मागील तीन दिवस थंडी कमी झाली होती. आता आकाश निरभ्र झाले आहे. कोरड्या हवामानात दिवसभर थंड वारे वाहत आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली आला आहे.

उद्यापासून तापमानात वाढ
उत्तरेतील बर्फवृष्टीमुळे आलेले थंडगार वार्‍यामुळे दोन दिवस थंडी वाढली. उद्यापासून हे वारे कमी-कमी होत जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून तापमानात वाढ होवून थंडी नाहिशी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषीविद्यापिठातील हवामान शास्त्र विभागाचे तापमापक मोहन देठे यांनी दिली.