
सामना प्रतिनिधी । मुंबई
अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे 41वे वार्षिक अधिवेशन आज रविवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात होणार आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.
अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक, डॉ. मोहन खताळ, डॉ. राजेंद्र धामणस्कर, डॉ. रोहिदास काळे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात दुपारी 2 ते 3.30 या वेळेत ‘सद्य परिस्थितीत उच्च शिक्षणातील आव्हाने आणि महाविद्यालयीन प्रशासन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 ते सायं. 5.30 या वेळेत खुले अधिवेशन पार पडेल. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह असणार आहेत. सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी संघाचे सुधीर काटेकर, माधव राऊळ, डॉ. आर. बी. सिंह, एस. एस. लांडगे यांनी केले आहे.

























































