जीएसटीवर आता कॉमिक बुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वस्तू आणि सेवाकर म्हणजे जीएसटी. या जीएसटीच्या कठीण समस्या आणि रहस्ये आता कॉमिक बुकच्या माध्यमातून उलगडणार आहेत. अनेक चित्रे असलेले ‘ऍडव्हेंचर्स ऑफ दी जीएसटी मॅन’ हे कॉमिक बुक नुकतेच बाजारात आले आहे. या चित्रांच्या माध्यमातून जीएसटीबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

श्रीनिवास कोटनी यांनी आपल्या या पुस्तकात एका सुपरहीरोच्या माध्यमातून अप्रत्यक्ष कराबाबत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जीएसटीबाबत लोकांनी उगीचच बाऊ करून ठेवला आहे. ते सरळ सोप्या शब्दांतही कळू शकते. पण त्यासाठीच आपण कार्टुन्स आणि व्यंगचित्रांची मदत घेतल्याचे ते म्हणाले. या पुस्तकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावना लिहिली आहे.