संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची खरेदीला मंजुरी, 114 राफेलने हवाई दलाची ‘पॉवर’ वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafel-deal

हिंदुस्थानी हवाई दलाला आणखी अतिरिक्त 114 राफेल जेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील डिफेन्स एक्विजिशन काउंसिल (डीएसी) समितीने या जेट्सच्या खरेदीला बुधवारी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानी हवाई दलाच्या लढाऊ विमानाची क्षमता आणखी वाढणार आहे. डीएसी ही संरक्षण खरेदी समिती आहे. या समितीचे अध्यक्ष संरक्षणमंत्री असून या समितीमध्ये लष्कराचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या समितीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नवीन शस्त्रास्त्र, उपकरणे आणि विमानांच्या खरेदीला मंजुरी देणे, बजेट आणि आवश्यक आधारावर निर्णय घेणे, मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे, ही समिती संरक्षण खरेदीला मंजुरी देते. त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटा (सीसीएस)ची अंतिम मंजुरी मिळते. डीएसीने 114 अतिरिक्त जेट्सच्या खरेदीली मंजुरी दिली आहे. यासाठी अंदाजित रक्कम 3.25 लाख कोटी रुपये मोजावे लागणार आहे. हिंदुस्थानी वायुसेनेकडे सध्या एकूण 36 राफेल जेट्स आहेत. जे 2016 च्या सौद्यातून मिळाले आहेत. परंतु, आयएएफला एपूण 42 स्वॉड्रनची गरज आहे. हे नवीन जेट्स मिग-21 आणि अन्य विमानांची जागा घेतील. राफेल एक मल्टि रोल फायटर आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर हल्ला करणे यात हे जेट्स एकदम पटाईत आहे.

114 राफेल जेट्स खरेदीचा निर्णय ऐन फ्रान्सचे राष्ट्रपती इमेन्युएल मॅक्रों यांच्या हिंदुस्थान दौऱ्या आधी आला आहे. मॅक्रों हे 15 ते 17 फेब्रुवारीला हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. दिल्लीत एआय समिटमध्ये सहभागी होणार आहेत. हा सौदा 2016 मधील असून हिंदुस्थानने फ्रान्सकडून 36 राफेल जेट्स खरेदी केले होते. यासाठी 59 हजार कोटी रुपये मोजले होते. जानेवारी 2026 ला डिफेन्स प्रोक्योरमेंट बोर्ड (डीपीबी) ने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता डीएसीने मंजुरी दिली आहे. यानंतर हा प्रस्ताव सीसीएसकडे जाईल. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कमिटी अंतिम निर्णय घेईल. जर याला मंजुरी मिळाली तर दसॉल्ट सोबत करार केला जाईल. 18 जेट्स रेडी टू फ्लाय येतील. बाकीचे हिंदुस्थानात बनवले जातील.