सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी चुरस रंगणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हौशी  रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी नगर महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा 26 ते 28 एप्रिलदरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत नगर येथील माऊली सभागृहात रंगणार आहे.

महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून 120 एकांकिकांमधून 33 एकांकिकांची या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाली आहे. अंतिम फेरीसाठी परीक्षक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता अद्वैत दादरकर आहेत. या वेळी दिग्गज कलाकार स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. त्यामुळे नाटय़प्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन दर्जेदार एकांकिकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे. या स्पर्धेचे ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर 1 ओटीटी तसेच डिजिटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-ऍप’ आणि ‘खासरे टीव्ही’ आहे.