संगीतकार इंद्रजीत शर्मा यांची नवी इनिंग, ‘कह रहा’ या अल्बमद्वारे गायक म्हणून पदार्पण

अनेक चित्रपट आणि अल्बमला आपल्या सुरेल संगीताने सजवणारे संगीतकार टबी ऊर्फ इंद्रजीत शर्मा हे ‘कह रहा’ या अल्बमच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. त्यांचा हा अल्बम
9 जूनला संगीतप्रेमींच्या भेटीला येत आहे.

मधुर गाण्यांनी सजलेला ‘कह रहा’ हा अल्बम प्रामुख्याने मुंबई ते केरळदरम्यान मनमोहक नैसर्गिक ठिकाणांच्या शोधात आपल्या गाडीवरून आपल्याच अनोख्या मस्तीत प्रवास करणाऱया एका मुसाफिराचा संगीतमय प्रवास आहे. या अल्बममधील गाण्यांना अनेक इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या सुरांचा साज चढविण्यात आलेला आहे. बंजारा स्टाईलमध्ये असलेली ही गाणी त्यांनी आपल्या मधुर आवाजाने सजविली आहेत. इंद्रजीत शर्मा हे आघाडीचे संगीतकार असून त्यांनी भाग मिल्खा भाग, राझी, छपाक, गुजारीश, ढोलकी (मराठी) आणि विश्वरुपम (तमिळ) आदी चित्रपटांतील शंभरहून अधिक गाण्यांना आपल्या संगीताचा साज चढविलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या