
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत पहलगाम, ऑपरेशन सिंदूरसह बिहारमधील मतदार फेरतपासणीच्या नावाखाली सुरू असलेल्या घोळावरून जबरदस्त हंगामा झाला. या गदारोळातही सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारने मतदार यादीत घातलेल्या घोळावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.