टिपू कमळाबाईचा लाडका… मुंबईतील दोन रस्ते आणि अकोला पालिकेतील सभागृहाला नाव दिले; काँग्रेसने पुराव्यानिशी बुरखा फाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिपू सुलतानबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन करत रान उठवले असताना टिपू सुलतान कमळाबाईलाच अधिक लाडका आणि जवळचा असल्याचे पुरावेच काँग्रेसने समोर आणले आहेत. अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृह तसेच मुंबईतील दोन रस्त्यांना टिपू सुलतानचे नाव भाजपनेच दिले आहे. ‘शहीदे वतन शेरे म्हैसूर’ म्हणून भाजपने टिपूचा गौरवही केला होता.

काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी एक्सवर भाजपच्या टिपूविरोधाचा बुरखा फाडला. टिपू सुलतानच्या नावाला विरोध हा भाजपचा दुटप्पीपणा असून ध्रुवीकरणाच्या अजेंडय़ाकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण भाजप करत आहे, असा आरोप करत सावंत यांनी पुरावेच दिले.

ठरावाला रितू तावडेंचा पाठिंबा; अमित साटम होते अनुमोदक

2013 मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने मांडला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांत महापौर रितू तावडे होत्या. अमित साटम अनुमोदक होते. या ठराव मंजूर झाला त्या बैठकीला भाजपचे 21 नगरसेवक उपस्थित होते. 

भाजपचे टिपू प्रेम

2012 मध्ये अकोला पालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान ठेवण्याचा ठराव भाजपचा होता.

2001 मध्ये अंधेरीतील मार्गाचे शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण करण्यासाठी गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत ठराव.