
दिग्दर्शक करण जोहर यांच्या 2019 मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल आता त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. तेव्हा तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्याच हातात गृहखाते होते. मग त्या पार्टीची चौकशी करावीशा फडणवीस सरकारला का वाटले नाही? कंगना राणावतचाही ड्रग्जबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे मग कंगनाला का चौकशीला बोलावण्यात येत नाही, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
“If the NCB is investigating old videos these days, then it should summon @KanganaTeam as well who had confessed in a video that she consumed drugs,” @INCMaharashtra leader @sachin_inc on NCB’s summon to @karanjohar over an alleged drug party organized in 2019 pic.twitter.com/qzFsxrHeNn
— Kanchan Srivastava (@Ms_Aflatoon) December 18, 2020
राष्ट्रीय तपास यंत्रणा या भाजप सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱयावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडीओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते तर मग कंगनाच्या चौकशीची हिंमत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ आहे. एनसीबीला ईडीतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल शोधण्यासाठी बोलवण्यात आले होते. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलची चौकशी करण्यात एनसीबी सपशेल फेल गेली आहे. आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे. सीबीआयसुद्धा सुशांतसिंह प्रकरणात काहीच निष्पन्न करू शकली नाही. एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही हे वास्तव आहे, असे सावंत म्हणाले.




























































