70 वर्षांत जे उभं केलं, ते सगळं विकून टाकणार! काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

randeep-surjewala

कोरोना संकटामुळे एकीकडे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे, तर दुसरीकडे सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे. सरकारच्या या धोरणावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं विकून टाकणार. ‘मोदी है, तो यही मुमकिन है’, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं आहे. या धोरणांतर्गत आधीच काही सार्वजनिक कंपन्यांतील हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी 26 कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. याबाबत काँग्रेस नेते सुरजेवाला यांनी ट्विट करत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे.

देशाच्या आणखी 26 सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहेत. 70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार आणि मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते,  ‘मैं देश नही बिकने दूँगा’. त्याचा अर्थ होता, देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है, तो यही मुमकिन है अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या