
देशभरात काँग्रेसमधील नेत्यांची भाजप आणि मित्र पक्षांत पळापळ सुरू असताना काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन हेही ‘तेलंगणा राष्ट्र समिती’च्या (टीआरएस) वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी काल ‘टीआरएस’चे नेते केटीआर यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली आहे.
हैदराबाद क्रिकेट संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर, टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री केटीआर यांची सर्व सदस्यांसह भेट घेतली. ही भेट औपचारिक असली असे म्हटले जात असले तरी त्यावरून अझरुद्दीन यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. गेली 10 वर्षे अझरुद्दीन काँग्रेसबरोबर असून 2009मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून ते खासदार म्हणून निवडून आले.



























































