नोटाबंदीनंतर आता ‘वोटबंदी’, बिहारमध्ये 2 कोटी लोक मतदानापासून वंचित?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत टक्क्याचा संशयकल्लोळ कायम असतानाच आता बिहारमध्ये मतदार संख्येत घोळ होण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील सुमारे 2 कोटी मतदारांवर ‘वोट बंदी’ची टांगती तलवार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार फेरतपासणीमुळे ही वेळ आली असून त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. एकाही मतदाराला मतदानापासून वंचित राहू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने आज दिला. ज्यांचा मताधिकार हिरावला जाणार आहे, त्या लोकांनी वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. 12 महिन्यांत असे काय झाले की लोकांना पुन्हा स्वतःला मतदार म्हणून सिद्ध करावे लागत आहे, असा सवाल काँग्रेसने केला.