प्रिया दत्त यांना काँग्रेस सचिवपदावरून हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priya-dutt

सामना ऑनलाईन,मुंबई

काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांच्या नावाची   लोकसभा  निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली असली तरी काँग्रेसने मात्र त्यांना जोरदार झटका दिला आहे. प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदाकरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना 26 सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिवपदाकरून हटवण्यात येत असल्याचे कळवले आहे. मात्र सचिव म्हणून दत्त यांनी केलेल्या कार्याचीही या पत्रात प्रशंसा करण्यात आली आहे. शिवाय भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचेही म्हटले आहे.

प्रिया दत्त यांच्या विरोधात घोषणाबाजी

रविवारी उत्तर-मध्य मतदारसंघात काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदकार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. 2014 पासून दत्त या मतदारसंघात फिरकल्यासुद्धा नाहीत. असे असताना त्यांच्या नावाची घोषणा कशी करता, असा सवाल यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता.