मोदींच्या मैत्रीचे परिणाम देश भोगतोय, ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेवर काँग्रेसचा हल्लाबोल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. यावर काँग्रेस पक्षाने यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, मोदींच्या ट्रम्प यांच्याशी असलेल्या वैयक्तिक मैत्रीमुळे हिंदुस्थानला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. काँग्रेसने आपल्या अधीकृत X अकाऊंटवरून पोस्ट करत ही टीका केली आहे.

काँग्रेसने आरोप केला की, मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले असून, त्यामुळे देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठा फटका बसत आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, मोदींनी ट्रम्प यांचा प्रचार केला, कमेकांना मिठी मिठी मारली. फोटो क्लिक करून ते सोशल मीडियावर ट्रेंड केले. तरी ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर कर लादले. हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”