
दिल्ली एनसीआरमध्ये दोन तासांत झालेल्या पावसामुळे जागोजागी कमरेपर्यंत पाणी साचले. रस्ते खचले, गुरुग्राममध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहने रस्त्यावर अक्षरशः वाहत जात होती. यावरून काँग्रेसने एक्सवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींच्या राज्यात बोट परवान्याची गरज नाही. फक्त कार आणि थोडा पाऊस झाला पाहिजे. दिल्ली, गुरुग्राम, यूपी बुडाले आणि मोदींचा विकास तरंगू लागला, अशी टीका काँग्रेसने केली आहे.