आवडत नसेल तर बघू नका, टूलकिट प्रकरणी चौकशीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावरील काँग्रेसच्या टूलकीटविरोधात चौकशीची मागणी करणाया एका याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याचिकाकर्त्याला टूलकीट आवडत नसेल तर ती बघू नका. त्याकडे दुर्लक्ष करा. हा एका राजकीय पक्षाचा राजकीय प्रपोगंडा आहे, आम्ही या अशा वायफळ जनहित याचिकेवर सुनावणी करणार नाही, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते ऍड. शशांक शेखर झा यांना फटकारले आहे. अशा प्रकारच्या तुच्छ याचिकांवर सुनावणी केली जाणार नाही. हवे तर याचिकाकर्त्याने हायकोर्टात जावे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे. कोरोना महामारीवर काँग्रेसच्या टूलकीट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेकडून

(एनआयए ) तपास करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास काँग्रेस पक्षाची नोंदणी निलंबित करावी, अशीही मागणीही याचिकेत केली गेली होती.