
हिंदुस्थानी कुस्तीपटूंनी गेल्या दीड महिन्यापासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन छेडलं आहे. ते आंदोलन दडपण्याचे हरेक प्रयत्न सरकार करत आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते या कुस्तीपटूंपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. एकिकडे केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर पळ काढला, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. असं असूनही केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांनी एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. देशाला पदकं मिळवून देणाऱ्या खेळाडूंविषयी प्रतिक्रिया न दिल्याने काँग्रेसने स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.
गुमशुदा pic.twitter.com/oOHzdFJuQw
— Congress (@INCIndia) May 31, 2023
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करून एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यावर स्मृती इराणी यांचा फोटो असून त्यावर मिसिंग म्हणजे हरवल्या आहेत, असं लिहिलं आहे. त्याखाली त्यांचं नाव आणि मंत्रीपदाचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.