सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत बिघाड, दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना एका तज्ज्ञ ‘चेस्ट स्पेशालिस्ट’ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहिकीनुसार, सोनिया गांधी यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी बऱ्याच काळापासून श्वसनाच्या समस्याने त्रस्त आहेत. त्यामुळे त्या वारंवार तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात. दरम्यान आता दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे त्यांना हा त्रास अधिक जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात सोनिया गांधी यांना पोटाशी संबंधित तक्रारींमुळे याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना गॅस्ट्रो विभागातील तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल