
सामना प्रतिनिधी। कराड
मलकापुर नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठीही काँग्रेसने बाजी मारली आहे. कांग्रेस 14, भाजपाला 5 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसने मलकापूरमधील सत्ता कायम राखली आहे.
दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची झाली. नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना मलकापूरवासियांनी बहाल केली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे – (भाजपा) 7477, नीलम धनंजय येडगे (कांग्रेस) 7747 (विजयी) थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारले आहे. भाजपाला नगराध्यक्षपद मिळणार ! हा राजकीय निरीक्षकांचा अंदाज फोल ठरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. आज सकाळपासून यशवंतराव चव्हाण मल्टीपर्पज हॉल कराड येथे मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपा दोन जागा मिळाल्याचा आला. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेसच्या विजयाने सुरुवात झाली ती शेवटपर्यंत कायम राहिले.
मलकापुर नगरपरिषदेचा निकाल म्हणजे देशातील व राज्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. मलकापूरच्या मतदारांनी विकासाच्या बाजूने मत दिले आहे. मलकापूरमध्ये कॉंग्रेस विरोधी भाजपा अशी लढत झाली यात काँग्रेसने यश मिळवले असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
यश अपेक्षित होतं त्याच्यामध्ये थोडंसं कमी मिळाले, काँग्रेसपक्षाच्या माध्यमातून मिळाला आहे. राज्याचे आजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार आनंदराव पाटील, सतेज पाटील, जयकुमार गोरे, यांच्या सहकार्याने काँग्रेसला यश मिळाले आहे ते मी नम्रपणे स्वीकारतो. अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केली. जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांना आश्वासन दिलेले आहेत ती पूर्ण करण्याकरता आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आमचे काम सुरूच राहील. धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. मात्र मलकापूरच्या जनतेने विकासाला मत दिले आहे, असेही मनोहर शिंदे यांनी सांगितले.
विजयी उमेदवारांना पडलेली मते – प्रभाग क्रमांक 1 – गीतांजली शहाजी पाटील (काँग्रेस), – 843 (विजयी), प्रशांत शिवाजी चांदे (काँग्रेस), – 794 (विजयी), प्रभाग क्रमांक 2- नूरजहान राजू मुल्ला (भाजपा) – 727 (विजयी), विक्रम अशोक चव्हाण (भाजपा) – 689 (विजयी), प्रभाग क्रमांक 3 – किशोर कृष्ण शेडगे (काँग्रेस), – 1049 (विजयी), आनंदी मोहन शिंदे (काँग्रेस), – 1067 (विजयी), समान मते मिळालेमुळे चिट्टी प्रक्रिया करण्यात आली. प्रभाग क्रमांक 4 – भारती दिलीप पाटील (काँग्रेस) -(विजयी – लॉटरी लागली कांग्रेसला), राजेंद्र प्रसाद यादव (काँग्रेस) – 733 (विजयी), प्रभाग क्रमांक 5 – भास्कर उर्फ सुबराव सोळवंडे (भाजपा) – 753 (विजयी), आनंदराव कुराडे (काँग्रेस) – 639 (विजयी), प्रभाग क्रमांक 6 – पूजा गणेश चव्हाण (काँग्रेस) – 758 (विजयी), शकुंतला विठ्ठल शिगण (काँग्रेस)-798 (विजयी), प्रभाग क्रमांक 7 – स्वाती समीर तुपे (काँग्रेस) -886 (विजयी), दत्ता सिताराम पवार(काँग्रेस) – 741 (विजयी), प्रभाग क्रमांक 8 – निर्मला आण्णासो काशीद (भाजपा), – 1020 (विजयी),अजित ज्योतीराम थोरात (भाजपा) – 974(विजयी), प्रभाग क्रमांक 9 – नंदा संजय भोसले (काँग्रेस) – 1852 (विजयी),अलका अशोक जगदाळे (काँग्रेस) – 1784 (विजयी), मनोहर भास्करराव शिंदे (काँग्रेस) – 1883 (विजयी).































































