बद्‍धकोष्ठतेची समस्या आहे, तर करा ‘हे’ घरगुती उपाय …

2204

अनियमित दिनचर्या आणि खान-पानातील बदलांमुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. जेवणानंतर चालण्याऐवजी बसून राहणे तसेच रात्री जेवून झोपण्यासारख्या सवयीमुळे ही समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता कोणत्या कारणामुळे होतो आणि ही समस्या दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करायला हवेत, याबद्दल सांगणार आहोत.

बद्धकोष्ठताची समस्या कशामुळे होते?

  • खान-पानातील बदलांमुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
  • पीणी कमी प्यायल्यामुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
  • सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
    स्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.

बद्‍धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

  • बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यातून लिंबू आणि एरंडेल तेल हे एकत्र करुन घ्यावे. सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते प्यावे. त्यामुळे ही समस्या हळूहळू दूर होत जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एरंडेल तेल मिसळून प्यावे. त्यामुळे सकाळी पोट सहज साफ होते.
  • रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून घ्यावे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते. आणि आपले पोटही निरोगी राहते.
  • गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते प्यावे. त्यामुळे पोटाची समस्या दूर होते.
  • त्रिफळा पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर थंड पाणी करुन ते प्राशन करणे. हा पोटासाठी रामबाण उपाय आहे.
  • पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटॅमिन डी आहे. म्हणून, दररोज शिजवलेले पपई खा.
आपली प्रतिक्रिया द्या