मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; शाळेत परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाणार असून 26 जानेवारीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे.

उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा समजला जातो. सर्व राज्यघटनेचे सार हे या उद्देशपत्रिकेत आहे. त्यामुळे त्याला महत्त्व दिले जाते. सार्वभौमत्व, प्रजासत्ताक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, न्याय अशा सगळय़ा महत्त्वाच्या तत्त्वांचा या उद्देशपत्रिकेत समावेश आहे.

यासंदर्भातील निर्णय 4 फेब्रुवारी 2013 रोजीच जाहीर केला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे सरकारने आज त्याबाबत दुसरा जीआर जारी केला.

चेतन कांबळे यांची मागणी

शाळांमध्ये परिपाठाच्या वेळेस संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करावे, अशी मागणी संभाजीनगरचे नगरसेवक चेतन कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी व्यक्त केली.