ज्वलनशील केमिकल भरलेल्या कंटेनरला अपघात; दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनपीटी बंदर परिसरातील कंटेनर यार्डमध्ये जाणाऱ्या कंटेनर टेलरला धुतूम ग्रामपंचायती जवळील आयओटीएल प्रकल्पाजवळील रस्त्यावर अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या कंटेनरमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याने वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाले होती. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

जीडीएल पेट्रोल पंपावरून डिझेल भरून हा कंटेनर ट्रेलर भिवंडीकडे जात होता. मात्र आयओटी कंपनीच्या पुढे आल्यानंतर हा ट्रेलर उलटला आणि कंटेनरमधिल केमिकल बाहेर पडले. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्यात जळजळू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या अपघाताची माहिती पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. अपघात हा धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील आयओटी कंपनी जवळ घडल्याने वाहनचालक व नागरीकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.