महिलांकडे उठणारे बोट छाटू !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदिगड

महिलांकडे बोट दाखवणाऱ्यांचे बोट छाटण्यात येईल, असे वादग्रस्त वक्तव्य हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपीला राज्य सरकारच्या कोणत्याही सोयीसुविधांचा लाभ घेता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या राज्यातील महिलांकडे बोट दाखवणाऱ्याचे बोट छाटण्याची व्यवस्था आम्ही करू असे वक्तव्य केल्यानंतर खट्टर यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. दुष्कृत्य करणाऱ्यांना कठोर दंड करण्यात येईल असे आपल्या म्हणण्याचा उद्देश होता. कोणताही क्रूर कायदा आणण्याचा आमचा उद्देश नसल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली. बलात्कार पीडितेला सरकाराने दिलेल्या वकिलाशिवाय दुसरा वकील करायला असल्यास पीडितेला २२ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, असेही खट्टर यांनी सांगितले.