इमारतीला ओसी मिळाली ‘कूपर’चे हॉस्टेल सुरू होणार, डॉक्टरांची ‘वणवण’ थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पालिकेच्या विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला अखेर प्रशासनाकडून ‘ओसी’ मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या डॉक्टर विद्यार्थ्यांची राहण्यासाठी सुरू असणारी वणवण अखेर थांबणार आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत दैनिक ‘सामना’ने 20 डिसेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.

पालिकेच्या विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजच्या दिमाखदार इमारतीचे उद्घाटन सात महिन्यांपूर्वी झाले. मात्र विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा पंपाऊंड येथील दहा मजली हॉस्टेल इमारतीला ‘ओसी’ नसल्याने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी इमारत खुली करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना महागडय़ा परिसरात राहण्यासाठी महिन्याला हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिंक भुर्दंड बसत होता. त्यामुळे ही इमारत विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात होती. पश्चिम उपनरवासीयांसाठी सर्वाधिक सोयिस्कर ठरणाऱया या मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी सुमारे 200 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन वर्षांपूर्वीच या ठिकाणची 150 विद्यार्थ्यांची क्षमता वाढवून 200 करण्यात आली आहे. यामुळे या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पसंती असते.

दिमाखदार वास्तू, अद्ययावत सुविधा

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कूपर रुग्णालय या ठिकाणी प्रथम वर्षासह पाच बॅचचे सुमारे 750 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. नियमानुसार या विद्यार्थ्यांना रुग्णालयाजवळ राहणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खर्च करावा लागत होता.

 मात्र या ठिकाणी आता विद्यार्थ्यांसाठी दहा मजली अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, पॅण्टीन, विद्यार्थ्यांसाठी  खाणावळ, बेड, फर्निचर, फायरसेफ्टी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. यासाठी शिल्लक कामे तातडीने पूर्ण करून पुढील किमान 15 दिवसांत हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येईल.