
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थाच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. गेल्या वर्षी खरीप पीक पेरणीच्या कामाचे निमित्त पुढे करीत सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.
सध्या सुरू असलेल्या 3 हजार 188 सहकारी संस्थांच्या निवडणुकांपैकी ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील 285 संस्थांच्या निवडणुका या आदेशामुळे लांबणीवर पडल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर महायुती सरकारने गेल्या वर्षी राज्यातील सुमारे 33 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय गेल्या वर्षी जून महिन्यात घेण्यात आला होता. तेव्हा तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावर्षी पुन्हा याच पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचे आमदारांचे साखर कारखाने व सूत गिरण्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी उच्च पातळीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सहकार विभागातील काही अधिकारी सांगतात.