कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन पर्यावरणाला ठरला वरदान!

479

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अमेरिका आणि इटलीमध्ये कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध देशांमध्ये लॉकडाऊन घेण्यात आला आहे. लॉडाऊनमुळे उद्योगधंदे, अर्थव्यवस्था ठप्प झाली असली तरी हा लॉकडाऊन पर्यावरणासाठी वरदान ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळाच उद्योगधंदे बंद असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीजवळील रोमच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांमुळे आणि औद्योगिक उत्पादनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. समुद्री जल गुणवत्ता चाचणीत मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे विविध औद्योगिक उत्पादने बंद आहेत. तसेच हवाई , मेट्रो, रेल्वे सेवा बंद असल्याने पर्यटनही बंद आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक येत नसल्याने प्रदूषणात घट झाली आहे.

हिंदुस्थानमध्येही गंगा नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे बंद असल्याने वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे पक्षीही मोकळा श्वास घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाहने बंद असल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषणही घटले आहे. जल आणि वायू प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषणही घटल्यामुळे अनेक महानगरांमध्ये पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकायला येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या