कोरोना हे तिसऱया महायुद्धाचे हत्यार, चीनने 2015 पासूनच सुरू केली होती तयारी

सारे जग कोरोना विषाणू संक्रमणाशी लढत असताना कोरोनाचा उगम आणि त्याचे केलेले व्यवस्थापन याबाबत चीनच्या भूमिकेबाबत अनेक सवाल उपस्थित करणारी स्फोटक कागदपत्रे आता समोर आली आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडर्सनी संभाव्य तिसरे महायुद्ध जैविक शस्त्राच्या मदतीने लढण्याचा विचार केला होता, ही बाब अमेरिकेच्या गृहखात्याने मिळविलेल्या कागदपत्रातून समोर आली आहे. याबाबत ‘वीकएंड ऑस्ट्रेलियन’ने सविस्तर वृत प्रसिद्ध केले आहे.

चीनच्या लष्करी शास्त्रज्ञांनी सार्स कोरोना व्हायरसचे हत्यार म्हणून वापर करण्याचा महामारीपूर्वी 5 वर्षे अगोदर विचार केला होता. कोरोना विषाणूचा तिसऱया  महायुद्धात वापर करण्याचे भाकीत वरिष्ठ शास्त्रज्ञांनी केले होते.

सार्स कोरोना विषाणू हे नव्या युगातील जैविक शस्त्र आहे. असे चीनच्या अहवालात म्हटले होते. चीनच्या शास्त्रज्ञांनी हा विषाणू कृत्रिमरीत्या मानवी साथ विषाणूत रुपांतरीत करता येईल आणि नंतर त्यांचा हत्यार म्हणून कधीही न पाहिलेल्या मार्गाने त्याचा वापर करता येईल.

चीनच्या लष्करी कागपत्राचे नाव ‘द अननॅचर ओरीजीन ऑफ सार्स अॅण्ड न्यू स्पेसीज ऑफ मॅनमेड व्हर्सेस जेनेटीक बायोवेपन्स’ असे आहे. चिनी भाषेतील या अहवालात जैविक हत्याराचा वापर शत्रूची वैद्यकीय सिस्टिम कोलमडण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

या कागदपत्रात अमेरिकन हवाई दलाचे कर्नल मायकेल जे. एन्स्कॉफ यांचा उल्लेख आहे. त्यांनी तिसरे महायुद्ध जैविक शस्त्रांचे असेल, असे भाकीत केले होते. या अहवालात 18 इतर लेखकांसह चीनच्या काही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांची नावे आहेत. त्यापैकी 10 लेखक शास्त्रज्ञ आणि हत्यार तज्ञ आहेत.

वर्ष 2015 मध्ये चीनचे लष्करी शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य अधिकाऱयांनी याबाबत अहवाल लिहिला होता. कोविड -19 चा उगमाबाबतचा त्यांच्या तपासणीतूनच हे समारे आल्याचे वीकएंड ऑस्ट्रेलियनने म्हटले आहे.

डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट रॉबर्ट पॉटर यांना सदर अहवालाच्या सत्यतेची पडताळणी केली आहे. पीएलए चे संशोधन आणि वैज्ञानिकांच्या कागदपत्रांची अधिकृत पडताळणी केली आहे या अहवालाचे मूळ चीनच्या इंटरनेटवर आढळल आहे, असे पॉटर यांनी म्हटले आहे. वुहानमध्ये नक्की काय घडले, या इंग्रजी पुस्तकात या कागदपत्राबबात सविस्तर माहिती लवकरत प्रसिद्ध होणार आहे.

ऑस्ट्रेलियन स्ट्रटेजिक पॉलिसी इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक पीटर जेन्निंग्ज यांनी सांगितले की ही कागदपत्रे म्हणजे धुमसणारी तोफ आहेत. या कागदपत्रावरून कोरोनाच्या विविध स्ट्रेनचा वापर करण्याबाबत आणि तो कसा तैनात करावा याबद्द लष्कराची भूमिका कळते. यातून कोरोना विषाणूचा अपघाती प्रसार लष्करी वापरासाठी केल्याची शक्यता दिसून येते. यातून लष्करी शास्त्रज्ञ कसा विचार करतात, हे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या