
कोरोनाचे निदान करण्यासाठी हिंदुस्थानात वापरण्यात येत असलेली आरटी-पीसीआर चाचणी ही 95 टक्के खात्रीशीर आहे, असे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओs) ने म्हटले आहे. ‘आयसीएमआर’ आणि ‘डब्ल्यूएचओ’ने दर्जा तपासणी उपक्रमांतर्गत केलेल्या चाचणीमध्ये आरटी–पीसीआर खात्रीलायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचे निदान करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. हिंदुस्थानात आरटी-पीसीआर चाचणीसह अँटिजेन टेस्टही केली जाते. नुकतीच मायलॅबच्या सेल्फ टेस्टिंग किटलादेखील मान्यता मिळाली आहे. मात्र अनेकदा आधी पॉझिटिव्ह आलेली कोरोना चाचणी काही वेळात पुन्हा केल्यास निगेटिव्ह आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 779 प्रयोगशाळांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांचा दर्जा तपासण्यात आला. यात या सर्व प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचण्यांचे निदान हे 95 टक्के बरोबर आले. या 779 प्रयोगशाळांमध्ये 410 सरकारी तर 369 प्रयोगशाळा खासगी होत्या.

























































