प्रदुषणामुळे 15 टक्क्यांनी वाढली कोरोना मृत्यूंची संख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदुषणामुळे कोरोना मृत्यूंची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

संपूर्ण जगात प्रदुषणामुळे 15 टक्क्यांनी कोरोना मृतांचा आकडा वाढला आहे.  कार्डियोवॅस्कुलर रिसर्चनुसार वायु प्रदुषणाच्या संपर्कामुळे कोरोना रुग्णांची संख्या 15 टक्क्यांनी वाढेली आहे. याचा सर्वाधिक फटका आशियाच्या पूर्व भागाला, युरोप आणि अमेरिकेला बसला आहे.

युरोपमध्ये प्रदुषणामुळे 19 टक्क्यांनी कोरोना मृतांचा आकडा वाढला आहे. तर अमेरिकेत 17 टक्क्यांनी मृतांचा आकडा वाढला आहे. आशियाच्या पूर्व भागात 27 टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

मानव निर्मित प्रदुषणापासून रुग्णांना दूर ठेवले असते तर मृत्यूदर कमी झाला असता असा दावा संशोधकांनी केला आहे.

चेकोस्लोव्हाकिया देशात 29 टक्के मृत्यू झाले आहेत. त्यानंतर चीनमध्ये 27 तर जर्मनी 26 स्विर्त्झलॅंडमध्ये 22 टक्के मृत्यू झाले आहेत. बेल्जियमध्ये 21, नेदरलँड 19, फ्रान्स 18, स्वीडन 16, इटली 15, इंग्लड 14, ब्राझील12, पोर्तुगाल 11 तर न्युझीलँड देशात हे प्रमाण अवघे 1 टक्के इतके आहे.