
कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर काही प्रमाणात कोरोनाची बनावट लसही बाजारात येण्याची शक्यता असल्याचा इशारा ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने दिला आहे. एजन्सीच्या अधिकाऱयांनी याबाबत सतर्पता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
याआधीही बनावट पीपीई आणि कोरोना टेस्ट किट बाजारात आणण्याचे प्रयत्न झालेले आहेत. अशा बनावट लसी बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ब्रिटनच्या नॅशनल क्राइम संस्थेने दिलेल्या माहितीनुसार बनावट लसीच्या वितरणात मोठय़ा गँग कार्यरत असतात, लसी विकसित करणाऱया संशोधन संस्थांच्या वेबसाईटवर त्यांचे हॅकर्स हल्ला करतात. त्यातून माहिती चोरून या लसी बनवल्या जातात. सध्या रशिया आणि चीनमध्ये लसींचे वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच येत्या काही महिन्यांत आणखी काही लसी येण्याची शक्यता आहे त्यातूनच बनावट लसी पुढे येतील.

























































