कोरोनामुळे फुलशेती करणारे शेतकरी मेटाकुटीला, बंद मार्केटमुळे लाखोचा झेंडू पडून

330

ओमकार पोटे

विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतकऱ्याचा कल सध्या फुलशेतीकडे वाढलेला आहे. त्यानुसार तालुक्यातील ओंदे गावातील चार शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एकत्ररित्या आठ एकरमध्ये रेड कलकत्ता व पिवळा पितांबरी या जातीच्या झेंडू फुलाची तब्बल ऐंशी हजार रोपाची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे.

जवळजवळ चार ते पाच दिवसाच्या अंतराने दोनशे किलो झेंडू काढला जात असून तो व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गुजरात येथील वापी, सुरत, बलसाड बाजारपेठेत विक्रीसाठी जात होता. मात्र सद्य परिस्थितीत कोरोना साथीच्या आजारामुळे सर्वत्र खबरदारी म्हणून मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने व्यापारी माल उचलत नसल्याने लाखो रुपयाचा झेंडू पडून राहत आहे. कालातरांने फुले खराब होऊन फेकून द्यावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अगोदरच झेंडूचा भाव पडलेला असून अवघ्या 20 ते 25 रुपये किलोने विकला जात होता. मात्र आता कोरोनाचे संकट शेतीवरही ओढवल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या