कोरोनाच्या संकटात ग्रामस्थांसाठी मदतीला धावले मुंबईकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही संकटात मुंबईकर धावून गेले नाहीत असे होत नाही. कोरोनाच्या संकटात देखील त्यांनी हे दाखवून दिले आहे.

कोरोना या संकटामुळे हाॅटेल, घरगुती नाष्टा सर्व बंद झाल्यामुळे ग्रामस्थ मंडळाच्या एकत्रित राहणा-या ग्रामस्थ बंधूंची व नागरिकांची आणि महालक्ष्मी धोबीघाट सातरस्ता गेट न.३ धोबी कामगार व नागरिकांची चहानाष्टाची गैरसोय होत असल्याने बेस्ट समिती सदस्य,आई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश कुसळे व विलास हदगले आणि सहकारी यांच्यावतीने योगेश्वर इमारत क्र.२ ना.म.जोशी मार्ग बावला मस्जिद समोर येथे ग्रामस्थ मंडळातील बंधूंसाठी सकाळी 7 वा.चहा व नाष्टा तसेच सायं.5 वाजता चहाची व्यवस्था करण्यात आली.