
शहरात कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होत असून, मागील पाच दिवसांमध्ये तब्बल चौदा हजार 184 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 84 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात नियंत्रणात आलेला संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासनासाठी चिंताजनक ठरत आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान शहरातील रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत नव्याने आढळून येणारी रुग्णसंख्या जवळपास शंभरच्या घरात आली होती. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱया आठवडय़ापासून नियंत्रणात आलेल्या या रुग्णसंख्येत पुन्हा दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढ होत आहे. मागील पाच दिवसांमध्ये 63 हजार नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात तब्बल चौदा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 84 जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी 2900 नवीन रुग्ण; 28 मृत्यू
शहरात रविवारी 2 हजार 900 रुग्ण नव्याने आढळून आले, तर एक हजार 245 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात 28 बाधितांचा मृत्यू झाला असून, यात पुण्याबाहेरील 8 जणांचा समावेश आहे.
पाच दिवसांतील नवीन रुग्ण स्थिती
दिनांक तपासण्या नवीन रुग्ण बरे झालेले मृत्यू
17/3 11230 2587 769 11
18/3 11835 2752 885 22
19/3 12625 2834 808 15
20/3 14484 3111 1094 16
21/3 12929 2900 1245 20
एकूण 63,103 14,184 4801 84





























































