कोरोनाबाधीताची उपचार केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या

571

कोरोनाबाधीत असलेल्या एका रुग्णाने उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आज सकाळी दहा वाजता येवलेवाडी परिसरात घडली.

गुंडाप्पा शरणाप्पा शेवरे (वय 55, रा.चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी उपचार केंद्रात दाखल केले होते. तेव्हापासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, आज सकाळी दहा वाजता त्यांच्या समवेतचे तीन रुग्ण नाष्टा करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. त्यावेळी शेवरे हे खोलीमध्येच थांबले. इतर रुग्ण नाष्टा करुन माघारी आले, तेव्हा त्यांना शेवरे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या