हिंगोली 6 नवे रुग्ण आढळले; कोरोनाबाधितांची संख्या 107 वर

465

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील एक तर वसमत तालुक्यातील 5 अशा एकूण 6 जणांचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या मुंबईहून परतले आहेत. इतर जिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 107 झाली असून 89 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, संभाजीनगर व इतर शहरांमध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. औंढा तालुक्यातील मुंबईहून परत आलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीसोबत वसमतमधील 5 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औंढा येथे एक, हिंगोलीमध्ये 2, संभाजीनगरला दोन तर वसमतमध्ये 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या