
संगमेश्वर ग्रामीण रुग्णायलातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 17 जणांपैकी 11 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरिश आगाशे यांनी दिली. त्यामुळे संगमेश्वरला दिलासा मिळाला आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन कक्ष आहे. आयसोलेशन कक्षातील 17 जणाचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून अजून 6 जणांचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत. संगमेश्वर तालुक्याचे लक्ष या रिपोर्टकडे लागले आहे.


























































